मनपा आयुक्त शितल तेली-उगले यांनी केली गणपती विसर्जनकरिता जलकुंडाची पाहणी

shivrajya patra

सोलापूर : गणेशोत्सवाचा उत्सव पारंपारिक पध्दतीने जल्लोषमय वातावरणात सुरू आहे. गणरायाच्या मूर्ती विसर्जनाने या उत्सवाची सांगता होते. गजानन मूर्ती विसर्जनकरिता नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून जलकुंडाची निश्चिती केली जाते. सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता प्रमुख लक्ष्मण चलवादी यांच्या टीमने संभाजी राजे तलावाची पाहणी केली. 
यावेळी विभागीय अधिकारी बाबर, मुख्य सफाई अधीक्षक एन. सी.बिराजदार, मंडई अधीक्षक नागेश मेंडगुळे, मुख्य आरोग्य निरीक्षक मंजुनाथ बागेवाडी, जे. इ. ढवळे, म्हेत्रे, रोडगे, आरोग्य निरीक्षक शेषराव शिरसट, श्रीदेवी गायकवाड खाजाप्पा कट्टीमनी, शीलरत्न दुडे, शिव कुलकर्णी, जमादार बाळासाहेब गोतसुर्वे, सूर्यकांत देशमुख, सुनील भालेराव राजकुमार उबाळे, सुपरवायझर प्रदीप चंदनशिवे उपस्थित होते.
To Top