जिल्हास्तरीय ४०० मीटर धावणे स्पर्धेत हर्षवर्धन ची कु. आरोही पाठमास प्रथम

shivrajya patra
कासेगाव/प्रतिनिधी : जिल्हा स्तरीय शालेय ४०० मीटर धावणे स्पर्धा मध्ये अक्कलकोट येथील फत्तेसिंह ग्राउंड तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये उत्तर सोलापूर येथे तळे हिप्परगे हर्षवर्धन हायस्कूलची विद्यार्थीनी कु. आरोही प्रदीप पाठमास हिने ४०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून तिची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

या यशाबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणारे प्रशालेचे क्रीडाशिक्षक सुरेश शिंदे व तिचे पालक प्रदीप पाठमास यांचे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
To Top