... आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते, गुरुवारी, १४ सप्टेंबर रोजी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस घेऊन हे उपोषण सोडले.
त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिताना, 'मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.
मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या.
आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.' असेही त्यांनी म्हटले आहे.
.............
#Maratha #Maratha Reservation
Translate post
2:39 pm 14 Sept 23. 43.1K Views