सोलापूरचे डॉ. अभिजित वाघचवरे बनले टफमॅन
सोलापूर/२७ : आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार्या आयर्नमॅन या स्पर्धेप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्या टफमॅन स्पर्धेत सोलापूरचे सुपुत्र प्रसिध्द अस्थिविकार तज्ञ डॉ. अभिजित वाघवचवरे यांनी मोठे यश मिळवून महाराष्ट्रात प्रथम तर देशात पाचवा क्रमांक मिळवला. चंदिगढ येथे रविवारी, २७ ऑगस्ट रोजी ही अत्यंत कठीण स्पर्धा पार पडली.
मानवी शरीर तंदरूस्त कसे आहे, याची मोजमाप करण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्याच अनुषंगाने सर्वांत कठीण अशी स्पर्धा म्हणजे आयर्नमॅन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. त्यामध्ये सायकलींग, स्विमिंग आणि धावणे अशा अवघ्या काही तासांच्या कालावधीत पार केल्यास त्याला आयर्नमॅन या स्पर्धेत निवड करण्यात येते.
त्याच धर्तीवर भारतात राष्ट्रीय पातळीवर चंदिगढ येथे टफमॅन ही स्पर्धा घेण्यात येते. त्यामध्ये १.९ किलोमिटर स्विमिंग, ९० किलोमिटर सायकलींग, आणि लगेच २१ किलोमिटर रनिंग घेण्यात येते त्यामध्ये जो यशस्वी होतो त्याला टफमॅन चा किताब देण्यात येतो.
ही स्पर्धा रविवारी, २७ ऑगस्ट रोजी चंदिगढ येथे घेण्यात आली. त्यामध्ये देशातील विविध राज्यातील केवळ १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात सोलापूरचे सुपुत्र तथा प्रसिध्द अस्थिविकार तज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे यांनीही जोरदार तयारी करून सहभाग घेतला आणि हे आवाहन त्यांनी अवघ्या सात तास वीस मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करून देशपातळीवर ५ वे तर महाराष्ट्रातील एकमेव येण्याचा मान मिळवला.
या स्पर्धेसाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून कठोर परिश्रम घेत स्वतःच त्यांचे रोजचे ट्रेनिंग प्लॅन व डाएट प्लॅन तयार केले होते. या स्पर्धेत त्यांना मोलाची साथ म्हणून डब्लू प्लस स्पोर्टस व इको सेंटरचे डॉ.सत्यजित वाघचवरे, डॉ. राजश्री वाघचवरे, डॉ. शुभांगी वाघचवरे यांच्याकडून मिळाली. गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी दक्षिण अफ्रिकेतील ९० किलोमिटरची कॉम्रेडस मॅरेथॉन पूर्ण करून सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर उमटवले होते.
वैद्यकीय सेवा करण्या सोबतच निरोगी राहण्यासाठी नव्या पिढीला नेहमीच मार्गदर्शन करणारे डॉ. अभिजित वाघचवरे यांनी चंदिगढ येथील टफमॅन स्पर्धा जिंकून शारीरीक तंदुरूस्तीचा नवा विक्रम सोलापूरकरांसमोर ठेवला आहे. टफमॅन स्पर्धेतील यशामुळे डॉ. अभिजित वाघचवरे आणि वाघचवरे परिवारांचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे.