Type Here to Get Search Results !

सिईओ मनिषा आव्हाळे यांचा नेत्रदानाचा संकल्प…!


राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा

बालकांनी पथनाट्यातून सांगितले  नेत्रदानाचे महत्व

सोलापूर -  जिल्हा परिषेदेच्या प्रशासक व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी मरणोत्तर  नेत्रदानाचा स्वतः संकल्प करून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नेत्रदानाचे आवाहन केले.

              जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात  जिल्हा अंधत्वनियंत्रण समितीने राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन व ज्ञान प्रबोधिनी शालेय विद्यार्थ्यांमार्फत नेत्रदान जनजागृती संदर्भात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे  या होत्या. प्रारंभी धन्वंतरी चे पुजन सिईओ आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. दीपप्रज्वलन केलेनंतर नेत्रदानाची शपथ देणेत आली.

या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, नेत्रतज्ञ गणेश इंदुरकर, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड प्रमुख उपस्थित होते.

              सिईओ मनिषा आव्हाळे यांचे सह अधिकारी  व कर्मचारी यांनी केला नेत्रदानाचा संकल्प केला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांचे हस्ते सिईओ यांना मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलेबद्दल सन्मानपत्र देणेत आले. त्यानंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, अधिक्षक अनिल जगताप, सहाय्यक लेखाधिकारी कटकधोंड, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांना नेत्रदान संकल्प पत्र वितरीत करणेत आले. त्यानंतर नेत्रदान केलेले नातेवाईक लक्ष्मीनारायण गुर्रम, प्रकाश विधानी, शरद ढाले यांचे मातोश्री यांचा गौरव करणेत आला.


सिईओ आव्हाळे यांनी केला नेत्रदानाचा संकल्प…!

 

जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी  यांनी नेत्रदान चळवळीत  सहभाग घेऊन नेत्रदान करावे. असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी करत स्वत मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. स्वर्ग व नरक कोणाला माहित आहे. याच डोळ्यांनी जग पहा.

या सभागृहामध्ये आपण जी शपथ घेतो त्या शपथेचा जीवनात अंगीकार करा. असे आवाहन उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. विलास सरवदे यांनी केले. आभार विकास लिंगराज यांनी आभार मानले.

बालकांनी पथनाट्यातून सांगितले  नेत्रदानाचे महत्व….!

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्याचे उदघाटन झाले नंतर ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी  पथनाट्याचे सादरीकरण केले.  अंध विद्यार्थीनीस नेत्रदानामुळे केस जग पहायला मिळाले…! याचे उभेउभ चलचित्र पथनाट्यातून मुला-मुलींनी सादर केले. हातात नेत्रदानाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी नेत्रदाना साठी उपस्थितांना आवाहन केले.

देवा .. माझे नशिबी असा अंधपणा का दिला…?

पथनाट्यात एका मुलींने अंधमुलीची भुमिका अतिशय चपखलपणे सादर केली. नेत्ररोपण केलेनंतर त्या मुलीच्या बोलक्या भावना हृदयास स्पर्श करणे सारखे होत्या.  डॉक्टर काका मला आता… मला सर्व काही दिसतय…! असे सांगून मुलीने सर्वांचे अंगावर रोमांच उभे केले.


ज्ञानप्रबोधिनी च्या गायत्री मोरे, भार्गवी सुतार, निहारिका हुच्चे, मृणाल देशमुख, अनघा पुजारी, आर्या गवळी, किरण भुसेकर, शर्वरी काटे, भार्गवी कुलकर्णी, आराध्या शंकू, अभया वानकर, समृध्दी होनमुटे, सर्वेश देशपांडे, शर्विल नागणे, श्रेयस सलगर, आदर्श आकुडे, प्रथमेश पवार, सुदर्शन रामपुरे, सुवर्णनील गलंडे, विनय कुलकर्णी, आयुष कांबळे, कणक शंकु, स्वरा स्वामी, शिक्षिका रत्नमाला जोशी, रजनी भदे, लेखक व निर्देशक राजु मोहोळकर यांनी या साठी परिश्रम घेतले.