सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील हर्षवर्धन हायस्कूलमध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष अर्जुन अष्टगी व रोटरी क्लबच्या सचिवा जान्हवी माखीजा यांच्या हस्ते प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य अनण्यपण्यावर यांनी आपल्या व्याख्यानातून अभ्यासक्रमातील विविध संकल्पना आत्मसात कशा कराव्यात, या विषयावर प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत व राष्ट्रीय हरित सेना समन्वयक शिक्षक संजय जवंजाळ, तसेच प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती पल्लवी दराडे यांनी तर संजय जवंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर ढगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.