पंढरपूर: पंढरीतील कला, क्रीडा, सांस्कृतीक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी बजावणारे दिपक राजाराम नाईकनवरे यांनी आपल्या कुटुंबापासुन कोसो दुर असलेल्या भारतीय सैनिकांचा राखी पौर्णिमेचा सण उत्साहवर्धक व आनंदी जाणेसाठी व सैनिक बांधवांना रक्षाबंधनादिवशी असंख्य भगिणींकडून बहिणींची माया मिळावी, या भावनेतुन ‘एक राखी भारतीय सैनिकांसाठी’ हा स्तुत्य उपक्रम राबवला.
यासाठी त्यांनी पंढरीतील विविध सामाजिक संस्था, संघटना, कला, क्रीडा, शैक्षणिक संस्था यांना राख्या जमा करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार हजारो राख्या जमा झाल्या. या सर्व राख्या दिपक नाईकनवरे यांनी भारतीय पोष्टाद्वारे हिमाचल प्रदेश, गोवा, लेह, लडाख आदी ठिकाणी देशाच्या सीमेचं रक्षण करणार्या सैनिक बांधवांना पाठवल्या.
त्यांचे वडील स्व. राजाराम नाईकनवरे व भारतीय सैन्यदलात सेवेत असलेले त्यांचे जेष्ठ बंधु विक्रम नाईकनवरे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं, त्यानुसार आवाहन केलं होतं. पंढरपुरातील असंख्य भगिणींनी यासाठी उदंड प्रतिसाद दिला. याबद्दल या सर्व माता, भगिणींचा ॠणी असल्याची भावना दीपक नाईकनवरे यांनी व्यक्त केली. पंढरीतील विवेक वर्धिणी विद्यालय, लोटस इंग्लिश स्कुल, न.पा. शाळा नं. ७ आदी शैक्षणिक संस्थांकडूनही या उपक्रमासाठी त्यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा राजाराम नाईकनवरे यांच्याकडे राख्या सुपूर्द केल्या,
देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत देशाचं रक्षण करणार्या जवानांना विविध सणांच्या काळातही आपल्या घरी येणे शक्य नसते, वर्षानुवर्षे आपल्या कुटूंबापासुन दूर राहिलेल्या या जवानांना या माध्यमातुन सणाचा आनंद मिळावा, बहिणींची माया मिळावी यासाठी या उपक्रमाद्वारे तमाम पंढरपुरकरांकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत आहे. अशी भावना यावेळी दिपक नाईकनवरे यांनी व्यक्त केली.
दिपक नाईकनवरे यांनी केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत पंढरपुरातील महिला भगिणींनी हजारो राख्या दिल्या. या राख्या सैनिक बांधवांकडे रवाना करताना पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, रुक्मिणी परिवाराच्या सुनेत्राताई पवार, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, लोटस च्या प्राचार्या चव्हाण, श्रीमती सुनंदा राजाराम नाईकनवरे, सौ. मंडाबाई साठे, सौ.शोभा वायदंडे, सौ.जनाबाई वाघमारे, सौ.माया वाघमारे, सौ.पल्लवी गायकवाड, सौ.अनिता वाघमारे, सौ.मालनताई मोरे, सौ.अनिता नाईकनवरे, सौ.रेखा यादव, सौ.मोना कांबळे आदी भगिणींसह शिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे, मुन्नागीर गोसावी, कृष्णा वाघमारे, राजु सर्वगोड, प्रा. डी.बी. कांबळे, डॉ. शिवाजी पाटोळे, आण्णा धोत्रे, चंद्रकांत खिलारे, संजय अडगळे, सुधीर रणदिवे, तात्यासाहेब आगावणे, शैलेश आगावणे, अमर रणदिवे, सुरेश बिनवडे, जीवन कांबळे आदी मान्यवरांसह पंढरपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..........चौकट.........
... पंढरीतूनच नव्हे तर देशातून कौतुक
पंढरीतील नाईकनवरे कुटूंबाला लाभलाय सामाजिक व देशसेवेचा आदर्श वारसा
पंढरपुरामधील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते कै.राजाराम नाईकनवरे यांनी आपल्या एका मुलाला देशसेवेसाठी सैन्यदलात पाठवले तर दुसर्या मुलाला सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रात सक्रीय केलं, आपल्या हयातीत त्यांनी पंढरीतील अनेक गरजुंना मदत केली, विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम राबवले. आज त्यांचाच हा समृध्द वारसा त्यांची दोन्ही मुलं जपत आहेत. दिपक नाईकनवरे यांनी आपल्या वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेत आपले भारतीय सैन्यदलात सेवेत असलेले थोरले बंधु विक्रम नाईकवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवलाय, जो सबंध भारत देशात राबवला जाईल. त्यांच्या या कार्याचं पंढरीतूनच नव्हे तर सबंध देशातून कौतुक होत आहे.