Type Here to Get Search Results !

'या' वैद्यकीय महाविद्यालयाला उत्कृष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा सन्मान




डॉ. वै. स्मृति. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय उत्कृष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून सन्मानित

सोलापूर दि.२४ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या शैक्षणिक सेवा आणि रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनामार्फत ठोस प्रशासनिक सुधारणा संबंधित उपक्रम राबविणे व संस्थांच्या कार्यचालनाचा आढावा घेण्यासाठी विशेष कृती नियंत्रण व विश्लेषण कक्ष स्थापन करण्याबाबत दि. १० मे २०२३ रोजी शासन निर्णयानुसार शासनामार्फत माहे मे २०२३ पासुन प्रत्येक महिन्याला राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचा डाटा संकलनाच्या आधारे मुल्यांकन करण्यात येत आहे.

माहे मे व जून २०२३ महिन्यामध्ये करण्यात आलेल्या मुल्यांकनाव्दारे डॉ.वै. स्मृती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर संस्थेस सलग दोन वेळा तिसरा क्रमांक प्राप्त झाला व माहे जुलै २०२३ मधील मुल्यांकनाव्दारे संस्थेस चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे.

२१ ऑगस्ट २०२३  रोजी व्हिडीओ कॉन्फरेंस व्दारे झालेल्या बैठकीमध्ये माहे मे २०२३ ते जुलै २०२३ मुल्यांकणाच्या आधारे एकंदरीत कामगीरीमध्ये सातत्य राखल्यामुळे स्वा.रा.तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई व डॉ.वै. स्मृती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर या दोन संस्थांना Best GMC Award (Govt. Medical College) म्हणून गौरव करण्यात आला. 

डॉ. अश्विनी जोशी, मा.सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मुंबई व श्री. राजीव निवतकर, मा.आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष यांनी स्वत: संस्थेच्या उत्कृष्ठ कामाबददल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे अभिनंदन केले.

या मुल्यांकन विविध प्रकारच्या पॅरामिटर्स वर आधारीत असून यामध्ये लहान- मोठी शस्त्रक्रिया, सर्व अध्यापकांचे व वरिष्ठ निवासी व कनिष्ठ निवासी डॉक्टर्स यांचे बायोमेट्रिक हजेरी नोंद, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेत अंर्तभूत केलेल्या रुग्णांच्या उपचारामधून शासनास प्राप्त महसूल, ई-औषधी पोर्टलव्दारे खरेदी व औषधांवर केलेला खर्च व इतर पॅरामिटरच्या आधारे हे मुल्यांकन ठरविण्यात येत असते. यामध्ये सोलापूर संस्थेचे काम उत्कृष्ट कामाची पोहोच पावती ह्या Award च्या माध्यमातून मिळाल्याचे समाधान अधिष्ठाता यांनी व्यक्त केले. 

भविष्यामध्ये देखील या संस्थेच्या माध्यमातून उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व गोर- गरीब रुग्णांना उच्च प्रतीची रुग्णसेवा तसेच संशोधनाचे कार्य सुरुच राहिल अशी प्रतिक्रीया अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.