भाऊ वाटणीचा क्षेत्र रस्ता मिळत नसल्याने आमरण उपोषणाचा इशारा
उस्मानाबाद : भाऊ वाटणीचा क्षेत्र रस्ता मिळत नसल्याने आमरण उपोषण करण्याचा इशारा लोहाटा पश्चिम तालुका कळंब येथील शेतकरी अशोक गुणवंत अडसूळ यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
एक वर्षापासून शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून शासन दरबारी अनेक अर्ज अनेक वेळेस अधिकाऱ्यांना भेटी घेतल्या मात्र शेत रस्ता मिळालेला नाही त्यामुळे दहा सप्टेंबर पर्यंत शेत रस्ता न मिळाल्यास अकरा सप्टेंबर पासून सह पत्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक अडचूळ यांनी दिला आहे सध्या जनावरांच्या पाणी वैरण व उसासाठी खत टाकणे व पाणी देण्यासाठी, बैलगाडी किंवा ट्रॅक्टर जाण्याची साठी रस्ता उपलब्ध नाही म्हणून माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तात्काळ दखल घेऊन शेत रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी अडसूळ यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. व मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिला आहे.