Type Here to Get Search Results !

शेतकऱ्याचा मुलगा पोलीस दलात भरती; गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक, आमदारही सहभागी


शेतकऱ्याचा मुलगा पोलीस दलात भरती; गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक, आमदारही सहभागी

*सारोळा येथील रणदिवे यांने लावले चार चाँद

*आ. कैलास दादांच्या हस्ते सत्कार, ठिक-ठिकाणी महिलांनी केले औक्षण

*हलगी, ढोल पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक
*जेसीबीने उधळला गुलाल

उस्मानाबाद : आई-वडीलांकडे अत्यल्प उत्पन्न.. त्यातून येणाऱ्या पैशातून घर, शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी होणारी आई-वडिलांची धडपड हे सर्व बघवत नव्हते. हि परिस्थिती बदलावयाची असेल तर आपल्याला अभ्यास करून मोठे व्हावे लागेल अशी जिद्द, चिकाटी अन कठोर मेहनत उराशी बाळगून सारोळा (बु.ता.जि.उस्मानाबाद ) येथील २४ वर्षीय तरूणाने यशाला गवसणी घातली आहे. गणेश श्रीकांतराव रणदिवे याने राज्य राखीव पोलीस दलात भरती होवून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या गावातील तरुण पोलीस दलात भरती झाल्याचा आनंद कुटूंबियालाच नव्हे तर संपूर्ण गावाला झाला. मग गावकऱ्यांनी या तरूणाची वाजत-गाजत व जेसीबीद्वारे गुलालाची उधळून करत भव्य मिरवणूक काढली. विशेष म्हणजे आपल्या गावातील सुपूत्राचे कौतुक करण्यासाठी आमदार कैलास (दादा) पाटील यांनीही थेट मिरवणुकीत सहभाग नोंदविला.


उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथील गणेश श्रीकांतराव रणदिवे हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलात भरती झाला आहे. प्रचंड कष्ट, जिद्दीने अपयशालाही हरवत गणेशने आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. शनिवारी (दि.१९) सायंकाळी हलगीचा कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गणेशची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. आपल्या गावातील सुपूत्र पोलीस दलात भरती झाल्याने धाराशिव-कळंब मतदार संघाचे आमदार कैलास (दादा) पाटील यांनीही या मिरवणुकीत सहभाग नोंदवून गणेशसह पालकांचा सत्कार केला. मिरवणुकी दरम्यान महिलांनी ठिक-ठिकाणी औक्षण केले. मिरवणुकीत तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आ. कैलास (दादा) पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ (अप्पा) गुरव, उपसरपंच वैभव पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तुकाराम (बापू) रणदिवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ललत (अण्णा) लिंगे, उपाध्यक्ष चंद्रकांत मसे, नितीन चंदने, माजी सोसायटी चेअरमन निवृत्ती (आबा) कुदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मगर सर, हरिश्चंद्र मगर, बंडू रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य छत्रपती उदारे, सुभाष रणदिवे, श्रीकांत रणदिवे, दिपक रणदिवे, नारायण बाकले सर, ज्योतीराम रणदिवे, प्रशांत पाटील, राजाभाऊ रणदिवे, मंगेश रणदिवे, प्रसाद मसे, अण्णा मंडोळे, बिभीषण कोल्हे, भैरवनाथ दरेकर सर, विकास जाधव, समाधान जाधव, चेतन वाठवडे (चिखली), विकास राऊत सर, शुभम पाटील (काजळा) आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.