सोलापूर : शहरातून गहाळ झालेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे प्राप्त करून पोलीस आयुक्तालयाच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी CEIR Portal आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे 30, 69, 483 रुपयांचे 184 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करण्यात आले.
केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती मिळण्यासंदर्भात CEIR Portal सुरु करण्यात आले आहे. या CEIR Portal द्वारे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती प्राप्त करुन घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरकडील तपास पथके वेगवेगळ्या परजिल्ह्यात तसेच परराज्यात पाठविण्यात आली होती. या तपास पथकांनी हे उल्लेखनिय यश मिळविले.
ही कामगीरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप-आयुक्त प्रितम यावलकर, पोलीस उप-आयुक्त श्रीमती अश्विनी पाटील, सर्व पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोह/महंमद रफिक इनामदार, पोह/संतोष पापडे, पोह एकनाथ उबाळे, पोह/खाजप्पा आरेवनवरु, पोह/ लक्ष्मीकांत फुटाणे, पोह/बाबू मंगरुळे, पोह/विठ्ठल पैकेकरी, पोह/बाबर, पोना/अयाज बागलकोटे, पोकॉ/अर्जुन गायकवाड, पोकॉ/ पंकज घाडगे, पोकॉ/विनायक जाधव, पोकॉ/ शैलेश स्वामी, पोकॉ/समाधान मारकड, पोकॉ/ संतोष वायदंडे, पोकॉ/बाबुराव क्षिरसागर, पोकॉ/महेंद्र फुलारी, पोकॉ/ सैफअली मुजावर यांनी पार पाडली.
... चौकट
नागरिकांना आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या गहाळ मोबाईलचा शोध होण्यासाठी ceir.gov.in या वेबसाईडवर जाऊन माहिती भरुन सहकार्य करावं, असं आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलंय.
****
