सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य आणि जनजागृतीच्या विविध उपक्रमांचे आयोजन

shivrajya patra

निमगांव (म)/संजय निंबाळकर : सेवा संकल्प अभियान व पोषण माह निम्मित आयोजित कार्यक्रम व पोषण, आरोग्य व जनजागृतीच्या विविध उपक्रमांचे आयोजन निमगांव येथे करण्यात आले होते. 


या आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे कर्तव्यदक्ष सभापती दत्ता मगर यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी सरपंच सुभाष साठे, माजी सरपंच आरती मगर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप मगर, पूजा मगर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (अकलूज विभाग) आस्मा अत्तार,पर्यवेक्षिका कदम, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस अणि लाभार्थी उपस्थित होते.

To Top