सोलापूर : फिरदोस महिला महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँदतारा उर्दू प्राथमिक शाळेस बसवेश्वर विचार मंचतर्फे उपक्रमशील शाळेचा पुरस्कार तसेच शाळेतील शिक्षक अशफ पटेल यांना कुलहिंद उर्दू अदबी कॉन्फरन्स सोलापूर यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले.
त्यानिमित्त शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्षा डॉ. जे. बी. बागबान व संस्थेच्या पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षकांचं अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता 06 वी च्या विद्यार्थीनी आलविया बागवान व सुमय्या शेख यांनी केले तर आभार शेख अलीशा यांनी मानले.
