NEET पेपर फुटीनंतर MPSC पेपर फुटी आणि MHT- CET मध्येही महाघोटाळा !; संभाजी ब्रिगेड शहर-जिल्हा च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

shivrajya patra

सर्व निवड प्रक्रियातील ऑनलाईन परीक्षा कायमस्वरुपी रद्द करून घ्यावी ऑफलाईन

सोलापूर : MPSC पेपर फुटी, MHT-CET परीक्षा घोटाळा, त्यामधील निवड प्रक्रियेतील पर्सेंटाईल पद्धती चुकीची असणे, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET परीक्षा कायमची रद्द करणे आणि सर्व निवड प्रक्रियातील ऑनलाईन परीक्षा कायम रद्द करून ऑफलाईन घेण्याच्या मागण्यांच निवेदन संभाजी ब्रिगेड शहर-जिल्हा च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना देण्यात आले.

महाराष्ट्रामध्ये MPSC पेपर फुटी, MHT-CET परीक्षा घोटाळा, शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भात सरकारची भूमिका जनहिताची नाही, यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे उपरोक्त विषयावर अत्यंत गंभीर आक्षेप आहेत. महाराष्ट्र राज्यात मागील अनेक दिवसापासून MPSC पेपर फुटी, MHT-CET परीक्षा घोटाळा, त्यामधील निवड प्रक्रियेतील पर्सेंटाईल पद्धती चुकीची असून ग्रामीण व गुणवंत विद्यार्थ्यांना अन्यायकारक आहे.

विशिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ही परीक्षा निर्माण केल्याचे मागील काही वर्षाच्या निकालवरून लक्षात येते. तसेच, परीक्षांचे सातत्याने घोटाळे सुरू आहेत. अनेक परीक्षांचे पेपरसुद्धा फुटलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. 

MPSC पेपर फुटी,MHT- CET महाघोटाळा, NEET परीक्षा पेपर फुटी, औषध निर्माणशास्त्र परीक्षा पेपर फुटी यासारख्या अनेक परीक्षांमध्ये सातत्याने पेपर फुटी होत असल्यामुळे परीक्षा रद्द झालेल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड मेहनत आणि करोडो रुपये व्यर्थ गेले असल्याचे संभाजी ब्रिगेडचे मत आहे.

सर्व परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे पालक वर्गामध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. परीक्षेतील या गोंधळामुळे व पेपर फुटीमुळे आपले मुलं-मुली काही चुकीचे पाऊल तर उचलणार नाही ना अशी भीती पालक वर्गामध्ये निर्माण झाली आहे. 

नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. तीच भीती आता पालकांच्या मनात आहे. त्यामुळे हा विषय अतिशय गंभीर असून सरकार अजूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड शिक्षण क्षेत्रात बदल होऊन सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याकरिता खालील मागण्या करत आहोत.

विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे सर्वजण शिक्षण व्यवस्थेतील या भ्रष्टाचारामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे संतापलेले असून प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता लागलेली आहे. विद्यार्थी देशाचे उद्याचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे सरकारने वरील मागण्या विषयात अत्यंत गांभीर्याने  लक्ष घालावे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. पीडित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना संभाजी ब्रिगेड शहर-जिल्हा च्या वतीने देण्यात आले. 

सरकारने जर ताबडतोब पाऊल उचलून दोषी व्यक्तींवर कारवाई केली नाही, तर संभाजी ब्रिगेडला यापेक्षा आक्रमक आंदोलन करावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याप्रसंगी निवेदन देताना संभाजी ब्रिगेड चे धाराशिव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख नितीन मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष अजयसिंह सौंमदळे, अंबादास सपकाळे, रमेश जाधव, कल्याण गव्हाणे, प्रकाश व्यवहारे, प्रकाश डोंगरे, अजयसिंग भोसले, अजय जाधव, विजय जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

*****

To Top