सोलापूर : 'जश्ने ईद मिलादुन्नबी' च्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठिकठिकाणी अन्नदान, शरबत वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यानिमित्ताने धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक उपक्रमांमधून एकता, बंधुभाव आणि सेवा करण्याचा संदेश देण्यात आला.
विजापूर वेस, शास्त्रीनगर, नई जिंदगी आणि शहरातील विविध चौकांमध्ये नागरिकांनी आपापल्या पद्धतीने ईद मिलादुन्नबी साजरी केली. मिरवणुकातील देखावे आकर्षण ठरले. अनेक ठिकाणी अन्न वाटप करण्यात आले, तर नागरिकांना शरबताचे वाटप करण्यात आले. राजू कुरेशी मित्र परिवाराच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले. तसेच उमर मर्चंट फ्रेंड सर्कलच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.
काही ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य शिबिर आणि सामाजिक इतर उपक्रमही घेण्यात आले. या उत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात विविध रंगांचे झेंडे घेऊन नागरिक उत्साहात जुलूसमध्ये सहभाग झाले होते.
शब्दांकन : वसिम राजा बागबान, सोलापूर.
