सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी, 01 ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकार कृती समितीच्या वतीने भैय्या चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, अर्जुन सलगर, विक्रम कसबे, डी. डी. पांढरे, अशोक ढोणे, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, वैजिनाथ बिराजदार, अकबर शेख, आर. डी. जाधव, महेश जाधव, चैतन्य घोडके, नरेंद्र कांबळे तसेच अन्य पत्रकार बांधव, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आर.टी.आय. कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व लोकजागृतीच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
