छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराला उदंड प्रतिसाद; 1,323 नागरिकांनी घेतला लाभ

shivrajya patra


सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे शुक्रवारी, 31 जुलै रोजी आयोजित समाधान शिबिराला पंचक्रोशीतील जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबीराचा 
1,323 नागरिकांनी लाभ घेतला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानांतर्गत 

कासेगांव येथील समाधान शिबिराचं उद्घाटन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध महसुली सेवा, दाखले, प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध करून देण्यात आला. 

महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. तसेच विविध दाखले, प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचा लाभ, महसुली सेवा आणि इतर आवश्यक सुविधांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत त्यांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी सोलापूर सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, कासेगांव सरपंच यशपाल वाडकर,उपसरपंच शहाजहान शेख, पंचायत समिती सदस्य विजय राठोड, सोमपा नगरसेवक अनंत जाधव, सोमनाथ पटणे, पंचायत समिती गटनेता बलवान गोतसुर्वे, सदस्य मळसिद्ध मुगळे, 

होटगी पंचायत समिती सदस्य सौ. अंबिका पाटील, सरपंच प्रशांत जाधव (गंगेवाडी), राज साळुंखे (बोरामणी), दशरथ कोळी, शंकर येणगुरे, मधुकर चिवरे, नाना भोसले, मनोज गुंड, प्रवीण चौगुले, दत्ता डांगे, तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात खालीलप्रमाणे दाखले वाटप करण्यात आले.

हयात दाखले-  257, युनिट वाढ- 240, युनिट कमी- 125, नवीन शिधापत्रिका- 10, संजय गांधी योजना- 17, उत्पन्न दाखले- 96, वय राष्ट्रीय अधिवास दाखले- 02, जातीचे दाखले- 13, नॉन क्रिमिलियर- 10, EWS प्रमाणपत्र- 18, 7/12  उतारा वाटप- 62, 7/12 दुरुस्ती- 12,  08 अ वाटप-  45,  आधार कार्ड- 164, पशुवैद्यकीय- 20   कृषि विभाग- 60,  आरोग्य विभाग-146  

महिला व बालकल्याण विभाग - 

1) बेबी केअर किट- 3   

2) लेक लाडकी योजना- 2 

3) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना- 7

4) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना- 23

5) माझी कन्या भाग्यश्री योजना 1 (FD रक्कम रुपये 25,000)

एकूण- 1,323

*****


To Top