जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना 13 टक्के लाभांश वाटप : राजेंद्र हजारे

shivrajya patra

लवकरच 350 कोटी रुपये ठेवींचा टप्पा ओलांडणार

सोलापूर : सर्व ठेवीदार, सभासद, खातेदार यांच्या सहकार्यामुळं, बँकेने सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यंदा सभासदांना 13 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असून लवकरच मल्टीस्टेट 350 कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा ओलांडणार असल्याची माहिती जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूरचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी दिली. 

सोलापूर येथील श्री टाकळीकर मंगल कार्यालयामध्ये जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑपरेट क्रेडिट सोसायटीची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे होते. 

यावेळी व्यासपीठावर मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे, मल्टीस्टेटच्या उपाध्यक्ष संजय जावळे, संचालक पंडित बुळगुंडे, विजय डांगे, नितीन कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, अमरसिंह देशमुख, कल्याण राऊत, लक्ष्मीकांत जाधव, रणजित हजारे, सचिन कट्टे, तानाजी तानगावडे, वर्षा विभुते, प्रियांका पाटील, गवळण गायकवाड यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अध्यक्ष राजेंद्र हजारे म्हणाले, मार्च 2026 अखेर बँकेने 275 कोटी रूपये ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. 198, 91, 76, 475 रूपयांचे कर्जवाटप के लं आहे. 91, 03, 98, 441 रुपयांची गुंतवणूक केली आहे. या आर्थिक वर्षात बँकेला 01, 71, 07, 677  रुपयांचा नफा झाला. एनपीए केवळ 01 टक्के असून बँकेने विविध ठेवीवर आकर्षक व्याज दर ठेवला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या मल्टीस्टेटकडून वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, महिला बचत गटांना कर्ज, सोने तारण, ऊस वाहतूक तोडणी कर्ज‌ यासह सर्व विविध कर्ज योजना यशस्वीपणे राबवित आहे. या माध्यमातून ठेवीदार, कर्जदार आणि समाजातील बेरोजगार तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. 

जनकल्याण च्या विविध तालुक्यात 27 शाखा असून येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढा, सोलापुरातील जुनी विडी घरकुल, निर्मिती विहार परिसर, शेळगी, कुंभारी आणि वळसंग येथेही मल्टीस्टेटच्या नवीन शाखा लवकरच सुरू करण्याचा मानस आहे. आमच्या जनकल्याण मल्टीस्टेट ने सामाजिक बांधिलकी जपत सीना नदीकाठच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

तसेच जनकल्याणच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर,मोफत चष्मे वाटप आणि त्यांचे ऑपरेशन करण्यात आलं. महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम ,शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करण्यात येतो. 

दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 मान्यवरांना जनकल्याण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जनकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे माझ्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे यांना विविध पुरस्काराने गौरव करण्यात आले. 

आगामी काळातही ठेवीदार, सभासद, खातेदार, कर्जदार आणि हितचिंतक या सगळ्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश सुरवसे यांनी केले. यावेळी नगरसेवक नरेंद्र काळे यांनी मल्टीस्टेटचे अध्यक्ष राजेंद्र हजारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे यांच्या कामाचे कौतुक करून मल्टीस्टेटच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

**

To Top