सोलापूर/20 जुलै : राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध आणि त्यांनी मांडलेल्या मागण्यांच्या समर्थनार्थ येथील सजग नागरिक यांच्या वतीने सोमवारी, 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर (पूनम गेट) इथं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी शांततापूर्ण पद्धतीने घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी लोकशाही मूल्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्त करत नागरिकांचा आवाज ऐकला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी केली.
आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न आणि सार्वजनिक धोरणांबाबत संवादाची आवश्यकता अधोरेखित केली. या आंदोलनात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विविध नागरिकांनी आपला पाठिंबा नोंदवत सामाजिक प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याचे महत्त्व मांडल
आंदोलनाची सांगता शांततेत करण्यात आली. सहभागी नागरिकांनी अशा जनहिताच्या विषयांवर भविष्यातही एकत्रितपणे लोकशाही मार्गाने भूमिका मांडण्याचा निर्धार व्यक्त केला. हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता निलेश संगेपाग, निरंजन बोध्दूल, शेखर बंगाळे, मल्लिकार्जुन पिलगेरी, रोबर्ट गौडर, यांनी परिश्रम घेतले.
