सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांना लोकमत Excellence Award मिळाल्याबद्दल त्यांचा प्राचार्य महेश सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
यावेळी माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, प्राचार्य औदुंबर जाधव (मंगळवेढा), राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रा. प्रकाश शिंदे, जिल्हा अध्यक्ष प्रा. युवराज भोसले, मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजी जगताप, संदीप निस्ताने, प्रा. अनुराधा पाटील, प्रा. माधव पाटील, प्रा. सचिन वाघमोडे, प्रा. सागर शिंदे, प्रा. विकास काटकर, नागनाथ गायकवाड, सावकार कारंडे, प्राचार्य श्रीशैल गुरव, स्वामिराव मोरे इत्यादी उपस्थित होते.
