एस.एस.सी. परीक्षेत सिद्धेश्वर प्रशालेचा जय जन्मले मराठी माध्यमात तर कु. कलावती बुजरी कन्नड माध्यमातून प्रथम

shivrajya patra

सोलापूर : फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. मराठी माध्यमात जय जन्मले हा विद्यार्थी 96.20 टक्के गुण प्राप्त करीत मराठी माध्यमात प्रथम आला तर कु. कलावती चंद्रकांत बुजरी हिने 86.20 टक्के गुण प्राप्त करून कन्नड माध्यमातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. 

सिद्धेश्वर प्रशालेचे मराठी माध्यमाचे विद्यार्थी प्रणव पाटील आणि वेदांत कल्याणशेट्टी या यशवंत विद्यार्थ्यांनी 94.40 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर ओमकार वैदकर या विद्यार्थ्याने 92.60 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला.

कन्नड माध्यमातून गायत्री तळवार ही विद्यार्थिनी 85.00 टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय तर अक्षता कोळी ही विद्यार्थिनी 83.00 टक्के गुण मिळवून तिसऱ्या स्थानी राहिली. या माध्यमातून प्रथम येण्याचा मान कलावती बुजरी हिने पटकाविला. तिला 86.20 टक्के गुण मिळाले.

कर्नाटकातील गुलबर्गा जिल्हा, अफजलपुर येथील कु. कलावती चंद्रकांत बुजरी हिचं नर्सरी ते 05 वी पर्यंतचे शिक्षण सासनुर प्राथमिक शाळा, अफजलपूर येथे झाले. त्यानंतर 6 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण श्री. सिद्धेश्वर देवस्थान संचलित, (कन्नड माध्यम) सिद्धेश्वर प्रशाला, सोलापूर येथे घेतले.

तिने इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत सतत उत्कृष्ट अभ्यास करून प्रत्येक वर्षी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. मार्च 2026 मध्ये झालेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत तिने कन्नड माध्यमातून 86.20 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला. 

कु. कलावती बुजरी हिने तिची मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळाबरोबर प्रशालेतील अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्यात मोलाच्या ठरल्या. कु. कलावती च्या नेत्रदीपक यशाचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.

To Top