इयत्ता 10 वी च्या परिक्षेचा निकाल जाहिर, सोलापूर जिल्ह्यात मुलींची बाजी

shivrajya patra

सोलापूर : माध्यमिक इ.10 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रवारी/मार्च 2026 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी, जाहिर झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा एकुण निकाल 91.31 टक्के लागला.  जिल्ह्यातून एकुण 35240 मुले 29 हजार 763 मुली यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 34 हजार 846 मुले  व 29 हजार 469 मुली असे एकूण 64 हजार 315 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. त्यापैकी 30 हजार 636 मुले व 28 हजार 091 मुली  असे एकूण 58 हजार 727 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  जिल्ह्यातील एकूण 195 शालांचा निकाल 10 टक्के लागला आहे. 

जिल्ह्यातील इ. 10 वी चा एकूण निकालामध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.91  टक्के  तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.32 टक्के असे एकूण निकाल 91.31 टक्के लागला आहे.

जिल्ह्यामध्ये विशेष श्रेणीमध्ये 15 हजार 531 विद्यार्थी शेकडा 26.44, प्रथम श्रेणीमध्ये 19 हजार 543 विद्यार्थी शेकडा 33.27 टक्के , व्दितीय श्रेणीमध्ये 16 हजार 865 शेकडा 28.72 टक्के तर पास श्रेणीमध्ये  6 हजार 788 विद्यार्थी शेकडा 37.47 टक्के उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद , शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

तसेच इ.11 वी साठी शाखा निहाय प्रवेश क्षमता खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.

विज्ञान शाखा- कनिष्ठ महाविद्यालयाची शाखानिहाय संख्या- 321,   प्रवेश क्षमता-36300

वाणिज्य शाखा- कनिष्ठ महाविद्यालयाची शाखानिहाय संख्या- 154,   प्रवेश क्षमता-15020

कला शाखा- कनिष्ठ महाविद्यालयाची शाखानिहाय संख्या- 344,   प्रवेश क्षमता-33980

एकूण - कनिष्ठ महाविद्यालयाची शाखानिहाय संख्या- 819,   प्रवेश क्षमता-85300

तरी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यानी जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा व इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशाची माहिती घ्यावी. सर्व कनिष्ठ  महाविद्यालयात याबाबत प्राचार्य व प्रवेशासाठी नियुक्त कर्मचारी माहिती देतील ,असेह शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) सचिन जगताप यांनी कळविले आहे.

To Top