कासेगांव / साहिल मुलाणी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं शनिवारी, 25 एप्रिल रोजी जॉन डियर ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेता श्री माऊली ट्रॅक्टर सोलापूर यांच्यातर्फे ग्राहक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यांत्रिक शेती ही काळाची गरज असून बदलल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यास शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
शनिवारी, सकाळी गावचे उपसरपंच शहाजहान शेख, सुधीर चौगुले, योगीराज उपाख्य अप्पी भोज, उत्तम येणगुरे, केदार येणगुरे, अप्पासाहेब पाटील, हणमंत जाधव इरफान शेख ईत्यादींची उपस्थिती होती. उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन बस स्टॉपजवळ कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात आला होता.
या शोरुम चे मॅनेजर नितीन शिंदे यांनी शेतकऱ्यांनी, त्यांच्याकडील ट्रॅक्टरची निगा अन् काळजी कशी घ्यावी, यासंबंधी सविस्तर माहिती दिली. ट्रॅक्टर कोणत्याही कंपनीचा असेल तर शेतकऱ्यांनी तो व्यवस्थितपणे कसा हाताळावा, याचंही मार्गदर्शन केले. 
त्यानंतर सर्व्हिस मॅनेजर अशपाक मुल्ला यांनी जॉन डियर ट्रॅक्टरमधील प्रमुख वैशिष्टांसंबंधी माहिती देताना, जॉन डियर टॅक्टर चे ओरिजनल पार्ट कसा ओळखावे याविषयी मार्गदर्शन केले. जॉन डियर कंपनी आणि इतर कंपनीतील पार्ट या मधील फरक दाखवून दिला. त्यानंतर जॉन डियर कंपनीच्या तिथे असलेल्या 5405 मॉडेल ट्रॅक्टरचं अनावरण केले. हा ट्रॅक्टर 63 hp कॅटेगरीमध्ये मोडत असून Bs.4 या मध्ये याच्या इंजिनचा समावेश होतो, असंही म्हटले.
दक्षिण सोलापूर चे सेल्स ऑफिसर साहिल मुलाणी यांच्याशी चर्चा करत कासेगांव चे द्राक्ष बागायतदार बळीराम तुकाराम कादे यांनी त्यांच्या बागेसाठी 7. 50 लक्ष रुपये किंमतीचा 28 एचपी जॉन डियर 3028 या मॉडेल चा ट्रॅक्टर खरेदी केला. 
सरतेशेवटी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचं आभार व्यक्त करण्यात आलं. चहापान अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
