नेल्सन मंडेला इंटरनॅशनल पीस पुरस्काराने मोहम्मद अयाज सन्मानित

shivrajya patra

मोहंम्मद अयाज यांनी पुरस्कार गुरुवर्य स्वर्गीय आशा भोसले यांना केला समर्पित

मुंबई : आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सोलापूरचे गायक तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांना नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले. त्यांनी हा पुरस्कार गुरुवर्य स्वरस्वामीनी स्वर्गीय आशा भोसले यांना समर्पित केला.

येथील पंचतारांकित हॉटेल रेडिसन येथे शुक्रवारी आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांना हा पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत निर्माता-निर्देशक मेहुलकुमार, संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या कलावंत आणि साहित्यिकांच्या सन्मान सोहळ्यास पोलीस महानिरीक्षक मोहन राठोड, संजीवकुमार चौधरी, एसीपी संजय पाटीलसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

या पुरस्कार सोहळ्यात देश भरातून पुरस्कार विजेत्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मोहम्मद अयाज नेल्सन मंडेला यांच्या साऊथ आफ्रिका येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या भारतीय संगीताचा प्रसार व प्रचार केलेला आहे. 

गाण्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी जपणारा कलाकार अशी मोहम्मद अयाज यांची जनमाणसांत ख्याती आहे. या सोहळ्यात मोहम्मद अयाज यांना नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले. 

हा पुरस्कार माझ्या संगीत वाटचालीस नक्कीच प्रोत्साहित करण्यात मैलाचा दगड ठरणारा असल्याची भावना अयाज यांनी व्यक्त करताना, त्यांनी हा पुरस्कार गुरुवर्य स्वरस्वामीनी स्वर्गीय आशा भोसले यांना समर्पित करून कृतज्ञता व्यक्त केली.

फोटो : निर्माता-निर्देशक मेहुल कुमार, संगीतकार दिलीप सेन, संजीवकुमार चौधरी, पोलीस सहआयुक्त संजय पाटील इत्यादी छायाचित्रात दिसत आहेत.

To Top