चाँदतारा उर्दू शाळेतील 07 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप

shivrajya patra

नूरुल ऐन परवेज आलम आतनुरकर हिचा विशेष सत्कार

सोलापूर : येथील फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेतील इयत्ता 07 वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या अध्यक्षा डॉ. जन्नतबी बागबान, बशीर बागबान, डॉ. परेवज आलम आतनूरकर, नूरूलऐन अतनूरकर, मुख्याध्यापक गजाला सौदागर आदींची उपस्थिती होती.

यावेळी  07 वी च्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेने उत्कृष्ट शिकविल्याने आमचे भविष्यात त्याचे चांगले उपयोग होईल, असा विचार व्यक्त केला.

तसेच नुकत्याच सीबीएससी 10 वी चा निकाल लागला असून त्यात आय. एम. एस. शाळेत 10 वी वर्गात शिकणारी नूरुल ऐन परवेज आलम आतनुरकर यांनी 94.40 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, उज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

To Top