निर्यापक श्रमण मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज लिखित ‘सुख की खोज’ जैन ग्रंथाचे अनावरण

shivrajya patra
सोलापूर/09 : सकल जैन समाज व वालचंद शिक्षण समूह आयोजित, परमपूज्य निर्यापक श्रमण मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज ससंघ यांच्या पावन मार्गदर्शनाखालील कार्यक्रमात, मुनीश्री वीरसागरजी महाराज रचित ‘सुख की खोज’ या जैनग्रंथाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व संतशिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या तैलचित्र पूजनाने अत्यंत मंगल वातावरणात झाली. खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ग्रंथाचे अनावरण संपन्न झाले. 
कार्यक्रमास आमदार सुभाष बापू देशमुख, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, पराग शहा, सौ. माया गांधी, अंकिता गांधी यांच्यासह जैन समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. प्रणिती शिंदे यांनी आपल्या मनोगतात वालचंद शिक्षण समूहाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत, “उच्च शिक्षणासोबत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा अत्यंत प्रेरणादायी आहे. जैन समाजाकडून करुणा, सहानुभूती आणि संवेदनशीलता शिकण्यासारखी आहे,” असे प्रतिपादन केले.
आ. सुभाष बापू देशमुख यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, “अशा आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संतांचे आशीर्वाद लाभणे ही भाग्याची बाब आहे,” असे सांगितले. तसेच त्यांनी सोलापूरसह संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना व्यक्त केली.

या भव्य सामूहिक णमोकार पठणाने केवळ धार्मिक भावना दृढ केल्या नाहीत, तर जैन तत्त्वज्ञानातील ‘जगा आणि जगू द्या’, ‘अहिंसा परमो धर्मः’ आणि ‘जीवदया हाच खरा धर्म’ या मूल्यांची प्रभावी पुनर्स्मृती घडवून आणली. णमोकार महामंत्राच्या निनादातून ‘पंचपरमेष्ठी’प्रति कृतज्ञता व्यक्त करत आत्मोन्नतीचा मार्ग अधोरेखित करण्यात आला.
प्रास्ताविकात पराग शहा म्हणाले, मनुष्य नेहमी सुखाची अपेक्षा करतो; मात्र लोभ, माया, क्रोध आणि अहंकार यांसारख्या विकारांमुळे तो दुःखी राहतो. ‘सुख की खोज’ या ग्रंथामध्ये मुनीश्रींनी साध्या व व्यवहार्य सूत्रांद्वारे खऱ्या सुखाचा मार्ग स्पष्ट केला आहे. या मार्गावर गुरुचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असून संयम, ‘स्वीकार’ (Acceptance) आणि ‘कृतज्ञता’ (Gratitude) या गुणांच्या माध्यमातून आत्मशुद्धी साधता येते. तसेच, ग्रंथातील विविध प्रकरणांद्वारे स्वतःच्या चांगल्या-वाईट सवयी ओळखून त्यात सुधारणा करण्याचा मार्गही दर्शविण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास सोलापूरातील सकल जैन समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील विविध जैन मंदिर समित्यांचे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या उपक्रमामुळे समाजात एकात्मता, शांतता आणि आध्यात्मिक जागराची नवी ऊर्जा निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात आली.

🌟
वालचंद शिक्षण समूहात निर्यापक श्रमणमुनी श्री वीर सागर जी महाराज यांच्या *सुख की खोज* पुस्तक विमोचन करताना खा.प्रणिती शिंदे आणि सकल सोलापुरातील जैन समाज
🟫 
आचार्य विद्यासागर महाराज यांच्या तैल चित्राचे माननीय अनावरण आ. सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी,भाजप शहराध्यक्षा सौ. रोहिणी तडवळकर,सोलापुरातील सकल जैन समाज विविध मंदिराचे महिला मंडळ मान्यवर.
 🌟
वालचंद शिक्षण समूहाचा परिसर पवित्र णमोकार मंत्राच्या मंगल ध्वनीने दुमदुमला; यावेळी खा. प्रणिती शिंदे आत्मशुद्धीच्या दिव्य अनुभूतीने भारावून गेल्या.
🟫 
वालचंद शिक्षण समूहाचा परिसर पवित्र णमोकार मंत्राच्या मंगल ध्वनीने दुमदुमला असून, संपूर्ण वातावरण अध्यात्म, शांतता आणि आत्मशुद्धीच्या दिव्य अनुभूतीने भारावून गेले आहे. श्रावकांच्या सामूहिक मंत्रोच्चारातून जैन धर्मातील अहिंसा, समता आणि आत्मोन्नतीचा संदेश प्रभावीपणे प्रकट झाला.
🌟
आ. सुभाष बापू देशमुख यांचा सन्मान करताना वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी.
 🟫
खा. प्रणिती शिंदे यांचा सन्मान करताना योग्य तज्ञ माया गांधी, डॉ.  रणजित गांधी, सौ अंकिता गांधी.
***
To Top