अवैध गौण खनिज कार्यवाही... ! उत्तर सोलापूर तालुक्यात 6 हायवा व 1 पोकलँड जप्त

shivrajya patra
सोलापूर/09 : जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या पथकानं मौजे कोंडी, बीबी दारफळ परिसरात अवैध गौण खनिज उत्खननावर मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.
या कारवाईत ६ हायवा व १ पोकलँड जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार अवैध खनिज उत्खननाविरोधात कठोर कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर उपक्रमांना आळा घालण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचं सांगण्यास तहसीलदार पाटील  विसरले नाहीत.
 ***
To Top