सोलापूर : वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३ वर्षे) यांनी अर्जदाराकडं पडताळणी दरम्यान पंचासमक्ष 3,000 रुपये लाचेची मागणी करुन 3,000 रूपयांची लाच ए.सी.बी. च्या सापळा कारवाई दरम्यान स्वतः स्विकारले. याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ए.सी.बी. कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बार्शी तहसील कार्यालयांतर्गत उपळे (दुमाला) मंडळ येथे मंडळ अधिकारी म्हणून पदभार असलेल्या हेमंत फुलारी यांनी शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावर वारस म्हणून आजीचे नाव नोंद होण्याकरिता आलेल्या अर्जावरून नोंदीस प्रमाणित करण्यासाठी व 7/12 उताऱ्याचे लॉक काढून देण्यासाठी (अनलॉक करणेसाठी) अर्जदाराकडे 3 हजार रुपयांची लाच मागितली होती.
अर्जदार तथा तक्रारदाराने याप्रकरणी सोलापूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यावर त्याची पडताळणी करून कारवाई सापळा रचण्यात आला होता. फुलारी 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडले.
याप्रकरणी मंडळ अधिकारी हेमंत फुलारी (रा. प्लॅटनं. ४०७ मन्मीत ब्लॉसम, चौथा मजला, जुनी आयएमएस शाळेजवळ, जुळे सोलापूर.) यांच्याविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे (ए.सी.बी., पुणे. मो.क्र 9823167154), अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील (ए.सी.बी., पुणे. मो.क्र 9029030530), पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (ए.सी.बी., सोलापूर. मो.क्र. 9823225465) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस हवालदार स्वामीराव जाधव, पोलीस हवालदार सलीम मुल्ला, चापोकॉ अक्षय श्रीराम (सर्व नेमणूक : ए.सी.बी., सोलापूर.) यांनी पार पाडली.
....एसीबीचं नागरिकांना आवाहन
लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करित असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (एसीबी सोलापूर. मो.क्र.9823225465) यांनी केलं आहे.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.
संकेतस्थळ- www.acbmaharashtra.gov.in
ईमेल-www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप-acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक 1064 दुरध्वनीक्रमांक- 0217-2312668व्हॉटस अॅप क्रमांक-9404 00 1064
