ध्वनी प्रदुषणाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या असलेल्या मार्गदर्शक सूचनांचं करावं पालन : एम. राज कुमार

shivrajya patra
सोलापूर : कोणताही उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदुषणाविपयी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव- 2026 मध्ये पालन करावं, असं आवाहन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंगळवारी,14 ते 19 एप्रिल दरम्यान साजरा होतोय. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी बुधवारी, सायंकाळी शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, आर टी ओ चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२६ चे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांची पोलीस आयुक्त कार्यालयात संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक पार पडली. पोलीस आयुक्त एम राजकुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 

प्रारंभी बैठकीची प्रस्तावना पोलीस उप आयुक्त श्रीमती अश्विनी पाटील यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्याचवेळी उत्सव सांगता मिरवणुकीत रविवारी, 19 एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविण्याबाबत सूचना दिल्या. 

त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगर पालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी त्या कामाची रुपरेषा बघुन समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिकांचं स्वागत करुन त्यांनी मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. 
यावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल, असंही पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी सूचित केलं.
या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांचं आभार करण्यापूर्वी शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. तसेच या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता पोलीस घेतील, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.
याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार,  पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे,  सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण (विभाग-१), दिलीप पवार (विभाग-२),  सुधिर खिरडकर (वाहतुक शाखा), राजन माने, (गुन्हे शाखा), सहा पोलीस आयुक्त पंडित (विशेष शाखा), सहा. पोलीस आयुक्त श्रीमती. विजयालक्ष्मी कुर्री (नियंत्रण कक्ष) तसेच सोलापूर महानगर पालिकेकडील अतिरीक्त आयुक्त कारंजे, धर्मादाय आयुक्त कडील निरीक्षक आसिफ शेख, कार्यकारी अभियंता महावितरण राजकुमार पाटील, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंके आदी अधिकारी तसेच, सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

🟧 ... या आहेत मार्गदर्शक सूचना !
👉 सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी, 
👉 मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा. 
👉 मोकाट जनावरांपासुन मुर्ती/फोटोस धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी. 
👉 देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र राखावे, देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांकरीता स्वतंत्र रांगेची सोय करावी, प्रवेशाकरीता आणि बाहेर जाण्यास स्वतंत्र गेट असावे. 
👉 मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास त्यामुळे गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. 
👉 त्याचबरोबर स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर जनजागृती करावी.
👉 सर्वोच्च न्यायालयाचे घ्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्टसर्कीट होवून इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी.
👉 सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर. टी. ओ. कडून तपासणी करावी. 
👉 मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. 
👉 मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाही व तसेच मंडळाने स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मुर्तीची देखभाल करतील याची पुरेपुर काळजी घ्यावी. 
👉 सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे. 

🟨 परवानगीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सुविधा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळानी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

To Top