सोलापूर/प्रतिनिधी : बहुजनांच्या साहित्याला एक हक्काचे विचारपीठ निर्माण व्हावे, याकरिता कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड यांच्या वतीने येत्या शनिवारी, ११ एप्रिल रोजी सोलापुरातील उपलप मंगल कार्यालयात तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन होत असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. बी. आर. कलवले, संयोजक पत्रकार भरतकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शनिवारी, ११ एप्रिल रोजी सकाळी ०८ वाजता ग्रंथ दिंडीने या साहित्य संमेलनाचा प्रारंभ होत असून चार हुतात्मा पुतळ्यापासून टाळ मृदुंगाच्या गजरात ही ग्रंथ दिंडी डॉ. आंबेडकर पुतळा, डफरीन चौक, संगमेश्वर महाविद्यालयमार्गे उपलप मंगल कार्यालय येथे या ग्रंथ दिंडीची सांगता होणार आहे.
सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन आ. अमित गोरखे यांच्या हस्ते तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख आ. सुभाष देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, माजी मंत्री बसवराज पाटील, साहित्यिक माधव गादेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. ज्येष्ठ साहित्यीक डॉ. श्रीपाल सबनिस संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.
यावेळी उद्योजक, शिक्षण महर्षी डॉ. कुमार करजगी यांना जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ. ऋत्विक जयकर(वैद्यकीय), ह.भ. प. विठ्ठल माने(धार्मिक),उत्तम माने (सामाजिक) यांचा विशेष गौरव होणार आहे. यावेळी संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या कर्मवीर स्मरणिकेचे प्रकाशन होत आहे, तसेच दत्तात्रय इंगळे, डॉ. एस. एन. पठाण, विजयकुमार सोनवणे, प्रिया चौधरी, किशोर जाधव यांच्या साहित्यकृतीचे प्रकाशन होणार आहे.
दुपारच्या सत्रात दुपारी २ ते ३ या वेळेत 'कर्मवीर भाऊराव पाटील यांची शैक्षणिक दृष्टी व सध्याचे शैक्षणिक धोरण' या विषयावर डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत असून यात प्रा. डॉ. अनिता शिंदे, प्रा. डॉ. जयदथ जाधव , प्रा. डॉ जयदेवी पवार, प्रा. डॉ. विजयकुमार कुमठेकर (जालना) हे सहभागी होत आहेत.
दुपारी ३ ते ६ या वेळेत कवी दत्तात्रय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाकवी संमेलनाचे आयोजन केले असून या कवी संमेलनात शहर जिल्हा व राज्यातील जवळपास ७० कवी सहभागी होत आहेत.
याप्रसंगी नरेंद्र गुंडेली, दस्तगीर जमादार, भगवान चौगुले, राजश्री जाधव, सुरेश निकंबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सायंकाळी६ वाजता या संमेलनाचा समारोप होत असून खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, यांच्यासह माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे माजी आ. राम गुंडेली, लेखक विलास सिदगीकर, उषा रवींद्र गायकवाड, माजी आ. बब्रुवान खंदाडे, मनपा गटनेते आनंद चंदनशिवे. यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, किरण गायकवाड, गंगाधर मामाने, उमरगाच्या सभापती अर्चना चौगुले, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यात दिगंबर ढेपे, राजेंद्र पाराध्ये, (शैक्षणिक), नानासाहेब मोरे, देविदास कसबे, अगंद जाधव (सामाजिक), अॅड. कोमल ढोबळे, अॅड गोविंद सूर्यवंशी (विधी), नागनाथ गायकवाड, उत्तरेश्वर मठपती, किशोर जाधव (सर्व साहित्यिक), डॉ. सिद्धेश्वर करजखेडे (वैद्यकीय) आणि दत्ता माधव वाघमारे (मुंबई-उद्योग) या मान्यवरांना गौरव चिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे.
सोलापूरससह तसेच राज्यभरातील सर्व साहित्यिकांनी या संमेलनास उपस्थिती रहावं, असं आवाहन स्वागताध्यक्ष लक्ष्मण कारले यांनी केले.
या पत्रकार परिषदेस ह. भ. प. विठ्ठल माने, दत्तात्रय इंगळे, विलास असोले ,पी. डी. वाघमारे, रमेश लोंढे अणि लक्ष्मण भोसले आदी उपस्थितीत होते.
टीप
बातमीत संमेलनाचा लोगो तसेच सम्मेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा फोटो घ्यावा.