मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णाला जीवदान !

shivrajya patra

फलके परिवाराने मानले देवेंद्र फडणवीस यांचं आभार                             
सोलापूर/प्रतिनिधी : महागड्या वैद्यकीय उपचारांमुळे हतबल झालेल्या सामान्य कुटुंबाला शासनाच्या मदतीने मोठा दिलासा मिळाला आहे. व्यवसायानं ट्रकचालक असलेल्या महेश चंद्रकांत फलके या रुग्णाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३ लाख रुपयांहून अधिक मदत मिळाल्याने त्यास जणू जीवदान मिळालं आहे. या मदतीबद्दल फलके कुटुंबियानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आभार मानले आहेत.

अशी होती घटनेची पार्श्वभूमी  ! 
ऋषिकेश चंद्रकांत फलके यांचे बंधू महेश फलके यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथील नामांकित रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, खाजगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च मोठा असल्याने फलके कुटुंब आर्थिक विवंचनेत होते.

... अशी मिळाली मदत  !
या कठीण प्रसंगात ऋषिकेश फलके यांनी आनंद गोसकी यांच्या माध्यमातून मदतीसाठी पाठपुरावा केला. त्यांना याकामी रामेश्वर नाईक आणि रुग्णसेवक आनंद गोसकी यांचं मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून उपचारांसाठी मदतीची विनंती करण्यात आली होती.
३ लाखांचे अर्थसहाय्य
रुग्णाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने ३ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला. या निधीमुळे महेश फलके यांच्यावर योग्य उपचार होऊ शकले.

"आमच्या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने आम्हाला जी मदत केली, ती आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्यामुळेच माझ्या भावाचे प्राण वाचले आहेत. आम्ही संपूर्ण फलके परिवारातर्फे त्यांचे ऋणी आहोत."
— ऋषिकेश फलके (रुग्णाचे भाऊ)

या मदतीमुळे फलके कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, परिसरात या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे."रुग्णाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हीच खरी रुग्णसेवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 

'' मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आम्ही आजवर आधार देऊ शकलो आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे."
- आनंद गोसकी, रुग्णसेवक.
To Top