सोलापूर : विश्वरत्न, घटनाकार, बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त “केवळ स्मरण नव्हे, तर त्यांच्या विचारांचे आचरण करूया” असा संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम
जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीने, 14 ते 20 एप्रिल दरम्यान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासकीय सेवा, शिक्षण, सामाजिक क्षेत्र तसेच
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे प्रतीक असलेला विशेष पेन प्रदान करण्यात येत आहे.
बाबासाहेबांनी दिलेला ज्ञान, समानता आणि न्यायाचा संदेश समाजात रुजवण्याचा आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न असल्याचे मत पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी व्यक्त केले.
या उपक्रमांतर्गत प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक, पत्रकार बांधव, चळवळीतील कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना
बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचे पेन भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून सिद्धार्थ भडकुंबे यांचे कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.