सोलापूर : क्रांतिसूर्य म. फुले आणि प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी दिली.
सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे यंदाचे 05 वं वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना एकूण 15,000 रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही परीक्षा जगताप क्लासेस, मॉडर्न शाळेसमोर, गांधी नगर सोलापूर येथे आयोजित करण्यात आलीय. 
ही परीक्षा लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेत सहभागी होण्यासाठी कमीत-कमी शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयोमर्यादेची कोणतीही अट नाही.
परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करायची असून परीक्षा फी आणि अधिक माहितीसाठी बुद्धजय भालशंकर (मो. 9960372736) आणि आशुतोष तोंडसे ( मो. 7038883339) यांचेशी संपर्क साधावा. या परिक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.
