रणरागिणी बहु. सामाजिक विकास संस्थेच्या वतीने ह. भ. प. रविकुमार ठावरे-पाटील यांचं व्याख्यान

shivrajya patra

निमित्त ... ! वेताळ बाबा यात्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती (पंचांगाप्रमाणे)

फलटण : तालुक्यातील नाईक बोमवाडी येथे वेताळ बाबा यात्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती(पंचांगाप्रमाणे) निमित्ताने रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण तसेच जय शिवाजी युवा मंडळाच्या वतीने ह. भ. प. रविकुमार ठावरे-पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली कांबळे, पंचायत समिती सदस्या सौ. विजया सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण च्या अध्यक्षा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रझिया शेख यांच्या सुयोग्य नियोजनात पार पडलेल्या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने राजमुद्रा (शिवमुद्रा) बंधन वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाची सांगता पाणीवाटप-बिस्कीट, अल्पोपहार वाटपाने झाली. 

या कार्यक्रमास अजय चव्हाण, धीरज चव्हाण, गणेश चव्हाण, पिसाळ ढमाल, रणजीत घाडगे, सौरभ पवार, दयानंद घाडगे, शुभम चव्हाण, रोहन ढमाळ, सौ. मनिषा चव्हाण, कमल चव्हाण, शालन घाडगे आणि सौ. जया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी  इम्रान सय्यद, उपाध्यक्ष अतुल शाह, खजिनदार कैफ शेख, सचिव मारुती टकले, कर्मचारी संचालिका मुख्याध्यापिका शाहीन शेख, सौ. माया बनसोडे, उपशिक्षक विद्यानगर शाळेचे चव्हाण सर, संचालिका सौ. प्रीती शाह, सौ. हिना सय्यद, सौ.अनिसा सय्यद, डिजिटल मिडिया संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व संचालक संचालिका व इतर सभासद उपस्थित होते.

   *****


To Top