वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेस प्रारंभ
सोलापूर : सध्याच्या जगात व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी अनेकविध प्रक्रिया करते. सौन्दर्य प्रसाधने उद्योग सध्या भलताच तेजीत आहे. सलून व पार्लर व्यवसायाला सध्या चांगले दिवस आलेत. असे जरी असले तरी चेहऱ्यावर हसू असलेली व्यक्ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असते, असे प्रतिपादन कवी अनिल दिक्षित यांनी केले.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनच्यावतीने आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना दिक्षित बोलत होते. 'हास्यरंग' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
याप्रसंगी नगरसेवक अमोल शिंदे, सिद्धेश्वर पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे, दक्षिण सोलापूर शिक्षण मंडळ विश्वस्त अण्णासाहेब कोतली, सोलापूर शहर बुरुड समाज माजी अध्यक्ष दशरथ वडतिले, साकव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश पाटील, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आणि उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थिती होती.
यावेळी कवी दिक्षित यांनी सादर केलेल्या 'सैराट' या कवितेने व 'खरातच्या अंगणी सत्संग' या विडंबन गीताने हास्याची निर्मिती केली. कवी भालचंद्र कोळपकर यांनी 'मामाची पोरगी' याबरोबरच अनेक विनोदी कविता सादर करून श्रोत्यांना खळखळून हसविले.
यावेळी आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील, श्रीमंत मेरू, योगेश कापसे, माधुरी बिराजदार, रेश्मा निडगुंदी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुरकुले यांनी, स्वागत विजयकुमार बिराजदार यांनी तर सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले. शेवटी विजयकुमार बिराजदार यांनी उपस्थितांचं आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, सिद्धेश्वर कोरे, गंगाधर झुरळे, गौरीशंकर अतनुरे, प्रा. मल्लिकार्जुन पाटील, अमित कलशेट्टी, विजयकुमार हेले यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना नगरसेवक अमोल शिंदे, प्राचार्य गजानन धरणे, अण्णासाहेब कोतली, दशरथ वडतिले, जगदीश पाटील, राजशेखर बुरकुले, विजयकुमार बिराजदार आणि अमित कलशेट्टी छायाचित्रात दिसत आहेत.
