श्रीरामपूर : मुस्लिम समाजातील पठाण बिरादरीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र पठाण समाज सेवा संघ या संस्थेची स्थापना करण्यात आली असून राज्याध्यक्षपदी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांची निवड करण्यात आलीय.
पठाण बिरादरीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या सभेत पठाण सेवा संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिरादरीच्या मुलांची शैक्षणिक प्रगती, सामाजिक विकास व महिलांना विकासाच्या सर्व संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. पठाण बिरादरीचे ज्येष्ठ मार्गदर्शक हाजी शरीफखान पठाण सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र पठाण समाज सेवा संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे- अमीर ए जमाअत - हाजी शरीफखान पठाण, अध्यक्ष- हाजी सलीमखान पठाण, कार्याध्यक्ष- मोहसीनखान पठाण, उपाध्यक्ष- अकबर पठाण, अमजदखान पठाण, सचिव- रफिक पठाण, सहसचिव- जुनेदखान पठाण, फिरोजखान पठाण, खजिनदार- फिरोज पठाण, सहखजिनदार- रफीकखान पठाण, अमजद पठाण, कार्यकारिणी सदस्य - रफिकखान पठाण, इम्तियाज पठाण, नियाज पठाण,ॲड. मोहसीन पठाण, जावेद पठाण, खालीदखान खलीलखान (मुन्ना), इमदाद पठाण, आरिफखान पठाण, मोहसीन पठाण, एम. एम. पठाण, महिला प्रतिनिधी- सौ. शाहीन पठाण, सौ.जुलेखा पठाण, सोशल सेल-मुन्ना पठाण, रज्जाक पठाण, रियाज पठाण, शमाभाई मुर्गीवाले, एज्युकेशन सेल- अरबाज पठाण, तौसिफ पठाण, मेडिकल सेल- डॉ. अरबाज पठाण, आफताबखान पठाण, आयटी सेल- शोएब पठाण, जेहान पठाण, अर्शान पठाण, नदीम पठाण, लीगल सेल- हाजी रियाज पठाण, ॲड. शाकीरखान पठाण, ॲड. एजाज पठाण, मीडिया सेल- तनवीर पठाण, आदिल पठाण, सरफराज पठाण, बँकिंग सेल- फैयाजखान पठाण, युथ सेल- जियान पठाण, हुजेब पठाण, रेहान पठाण, अयान पठाण, रिलिजियस सेल- मौलाना अब्दुल पठाण, ऑफिस अश्फाक पठाण, दानिश पठाण.
पठाण सेवा संघाच्या माध्यमातून राज्यभरातील पठाण बिराजदारीचे संघटन करून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सलीमखान पठाण यांनी सांगितले. यावेळी पठाण बिरादरीचे सहाशेपेक्षा जास्त कार्यकर्ते, युवक व नागरिक उपस्थित होते.
राज्यभरातील तालुका व जिल्हा कार्यकारिणीची स्थापना लवकरच करण्यात येणार असून संघटनेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अध्यक्ष सलीमखान पठाण- 9226 40 8082 आणि कार्याध्यक्ष मोहसिनखान पठाण- 8668 99 1818 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन संघटनेतर्फे करण्यात आलं आहे.