प्रतापनगर तांडा येथे 02 व 03 मे रोजी भव्य गोरपीठ यात्रा महोत्सवाचं आयोजन : प्रकाश राठोड

shivrajya patra

सोलापूर : संत हुनाबापू प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रतापनगर तांडा येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य गोरपीठ यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या यात्रा उत्सवामध्ये 02 व 03 मे रोजी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाला अनेक संत, महंत, पुजारी यांच्यासह सामाजिक तसेच राजकीय नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती प्रकाश राठोड यांनी दिलीय.

शनिवारी, 02 मे  रोजी सायंकाळी भोग धार्मिक विधी पूजा, रात्रभर भजन कार्यक्रम तसेच सुप्रसिद्ध गायक आकाश चव्हाण यांच्यासह प्रतापनगर तांडयातील अनेक कलाकारांची उपस्थिती राहणार आहे. रात्रभर बंजारा भजन, गायन, नृत्य सादर करण्यासाठी अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्यात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना गोरपीठ संस्थानच्या प. पु. मोतायाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण आणि सन्मान पत्र देण्यात येणार आहे.

रविवारी,03 मे रोजी सकाळी देवी-देवतांचे अभिषेक स्नान पुजा भोग भंडारा व प्रसाद कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाजातून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बंधू-भगिनींना सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

तरी सोलापूर जिल्यातील सर्व भाविक भक्तांनी या भव्य धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असं आवाहन गोरपीठ संस्थानच्या वतीने संस्थानचे प्रमुख प्रकाश राठोड, सामाजिक कार्यकर्ते

 नेहरू राठोड आणि डॉ. श्रीमंत राठोड (प्राचार्य- ठाणे) यांनी केलं आहे.

.... चौकट 

सांस्कृतिक धार्मिक कार्याबरोबर इथं होतो समाजातील गुणवंतांचा गौरव

या संस्थानचे प्रमुख प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार मंदिरात आदिशक्ती माता, संत शिरोमणी सेवालाल महाराज, भगवान श्री श्री हामुलाल महाराज आणि संत हुनाबापू यांची मूर्ती स्थापना  करण्यात आलेली आहे.  गोरपीठवरती अतिशय भक्तिमय वातावरण असून त्या ठिकाणी आसपासच्या परिसरातील हजारो भाविक भक्त दर्शनाकरिता येतात. त्याचबरोबर दर अमावस्या पौर्णिमेला भाविकांची विशेष गर्दी असते. 

या मंदिरात वर्षभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबविले जातात. होळी, दिवाळी, दसरा, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा असे सण उत्सव  कार्यक्रम देखील साजरे केले जातात. हे बंजारा समाजाचे श्रद्धाचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे.

To Top