प्रशांत कटारे, परशुराम कोकणे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी
सोलापूर/१० मार्च : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर शहर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली असून अध्यक्षपदी विकास कस्तुरे, कार्याध्यक्षपदी सचिन जाधव, उपाध्यक्षपदी विक्रम इंगळे, तर सचिवपदी शिवाजी सावंत यांची निवड जाहीर करण्यात आलीय. 
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी दुपारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रशांत कटारे यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे. 
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांचीही विशेष उपस्थिती होती. 
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. 
राजा माने यांनी आपल्या मनोगतात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची संपूर्ण देशभरात वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितले.
... हे आहेत नूतन पदाधिकारी
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष: प्रशांत कटारे
पश्चिम महाराष्ट्र संघटक : परशुराम कोकणे 
सोलापूर शहराची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष : विकास कस्तुरे,
कार्याध्यक्ष : सचिन जाधव,
सरचिटणीस : रवींद्र जोगीपेठकर,
उपाध्यक्ष : विक्रम इंगळे,
उपाध्यक्ष : इमरान सगरी,
खजिनदार : चंदन बोल्लू,
सचिव : शिवाजी सावंत,
प्रसिद्धी प्रमुख : अकबर बागवान आणि कार्यकारिणी सदस्यपदी अप्पासाहेब बनसोडे, जहूर सय्यद, अनिल कांबळे, अर्जुन चव्हाण, साकिब शेख, प्रसाद ठक्का, योगेश कल्याणकर, बालाजी चिटमिल, दयानंद मामड्याल, इकबाल शेख आणि आबादी राजे यांची निवड करण्यात आलीय.

