सोलापूर : सोलापूर सोशल असोसिएशन आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयात 09 महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभागाच्या एनसीसी कॅडेट दत्ता हनुमंत इंगळे यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलात निवड झाली.
दत्ता इंगळे हे सोशल महाविद्यालयातील एनसीसी विभागमध्ये एक मेहनती व शिस्तप्रिय विद्यार्थी असून त्यांनी एनसीसीच्या माध्यमातून शिस्त, देशसेवा आणि नेतृत्वगुण आत्मसात केले आहेत. त्यांच्या या गुणांचा उपयोग पोलीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर झाला.
कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर त्यांनी शारीरिक तसेच लेखी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशाबद्दल 09 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कमाडिंग ऑफिसर कर्नल रणधीर सतीश, लेफ्टनंट कर्नल शरब बाबर आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, एनसीसी अधिकारी मेजर डॉ. गौस शेख, प्रा. रईसा शेख, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दत्ता इंगळे यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने देशसेवा करतील, असा विश्वास एनसीसी अधिकारी मेजर डॉ. गौस शेख यांनी व्यक्त केले.