जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सौ. अनिता चौधरी यांची नियुक्ती

shivrajya patra


धामोरी/प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन. न्यूज 24 संलग्न प्रणीत जळगांव येथील माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवा संस्थापक/आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश संकुडे यांच्या व टिमच्या उपस्थितीत सौ. अनिता राजेंद्र चौधरी (जळगांव) यांची माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवेच्या जळगांव जिल्हा महिला अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती पत्र देऊन गुणगौरव करुन बहाल करण्यात आले.

त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील कार्यप्रणाली पाहुण माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवेच्या वरील पदावर नियुक्ती करण्यात आली. 

सामाजिक कार्यात माहिती अधिकार पत्रकारिता व पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून तसेच समाजातील विविध प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडविण्याचे व संघटनेची विचारधारा यशस्वीरित्या करण्यासाठी जबाबदारी स्विकारावी. आपली गुणवत्ता कार्यक्षमता व संघटनेशी बांधणी याचा विचार करून संघटनेच्या नियमांचे पालन व्हावे, कायदे व भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न व न्याय हक्कासाठी बांधलकी जपावी, अशा अपेक्षा व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यांची जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने जळगाव जिल्हा व परिसरात अभिनंदन अन् शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
To Top