बार्शी : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने सुलाखे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीचे नूतन प्राचार्य रामकृष्ण इंगळे आणि नूतन उपप्राचार्य प्रसन्न देशपांडे यांचा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महासंघाचे बार्शी शहराध्यक्ष मल्लिकार्जुन कांबळे, प्रशालेचे मुख्य लिपीक उमेश ठोंबरे, संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष धनाजी धिमधीमे, उपाध्यक्ष शाहू वाघमारे, सुनील सगरे, सुशीला काळे, बप्पा मोठे, बाबुराव हिप्परगी, संजय कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य रामकृष्ण इंगळे, उपप्राचार्य देशपांडे तसेच महासंघाचे बार्शीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कांबळे,सुशीला कांबळे तसेच उपप्राचार्य प्रसन्न देशपांडे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी नूतन प्राचार्य आणि प्राचार्य यांना शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून उत्कृष्ट कार्याची अपेक्षा व्यक्त केली. संस्थेच्या, शाळेच्या, संघटनेच्या नावाला साजेसे असं काम करावं, असेही ते म्हणाले.शेवटी मुख्य लिपीक उमेश ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर चहापानानं सत्कार कार्यक्रमाची सांगता झाली.