महिला उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि ए.आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांसाठी शुक्रवारी, 06 मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.  सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक महिला उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय.टी.आय. डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीय, नर्सिंग, बी.कॉम, अशा प्रकारची एकूण 500 पेक्षा जास्त रिक्तपदे 10 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.

नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह शुक्रवारी, 06 मार्च 2026 रोजी ठीक सकाळी 10 ते दुपारी 01 या वेळेत "ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय रविवार पेठ, राजेंद्र चौक, सोलापूर" येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत 0217-2992956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती संगीता खंदारे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांनी केले आहे. अधिक माहितीस्तव https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी, अशी माहिती सहायक आयुक्त ,कौ. वि. रोजगार व उद्योजकता यांनी दिली आहे.

To Top