सामुहिक दुष्कर्माचा बनाव करून फिर्याद; अर्जदार महिलेसह प्रियकरही गजाआड

shivrajya patra

सोलापूर  : चार व्यक्तींनी सामुहिक बलात्कार केल्याच्या खोट्या घटनेचा बनाव करुन, पोलीसांना दिलेल्या माहितीची चौकशी करुन, ती घटना खोटी असल्याची चौकशी अंती निष्पन्न करुन, त्या महिलेसह तिच्या प्रियकरावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची दिशाभूल दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात आलंय.

न झालेल्या सामुहिक दुष्कर्म प्रकरणाची अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील  महिला आणि तिचा प्रियकर हे एकमेकांना सन २०२२ पासून ओळखत असून ते एकमेकांचे प्रियकर व प्रेयसी आहेत. त्या प्रियकरावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल होता.

 त्यास त्या गुन्ह्यात २२ डिसेंबर २०२३ रोजी अटक झाली होती. आरोपीस उच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच येथून १८ सप्टेंबर २०२५ जामीन मिळवल्यानंतर तो जेलबाहेर आला. या जामीनाविरुध्द उपरोक्त गुन्ह्यातील फिर्यादीने सर्वोच्च न्यायालया येथे अपील दाखल केले. त्याप्रकरणी १७ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीअंती आरोपीचा मिळालेला जामीन रद्द केला. 
या केसमधील फिर्यादी, साक्षीदार व त्याचे नातेवाईक अशा चौघांवर सामुहिक बलात्काराचा खोटा गुन्हा नोंद झाल्यास त्याचा फायदा त्या आरोपीस होण्यासाठी दोघांनी संगनमताने कट रचून तिने १८ मार्च रोजी रात्री ०८:३० वा. तिच्यावर चौघांनी सामुहिक दुष्कर्म केल्याची माहिती डायल ११२ येथे दिली. 

त्यानंतर पोलीसांनी या घटनेची बारकाईने चौकशी केली असता, त्या महिलेची मानसिक व शारिरीक परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल नंबरचे सीडीआर अॅनालिसीस, वैद्यकीय तपासणी, महिलेची मैत्रिण, महिलेची बहीण इत्यादींकडं बारकाईने चौकशी करुन अखेरीस महिलेकडे चौकशी करता, तिने सदरची घटना घडली नाही, ती खोटी आहे असे मान्य करुन तसा जबाब दिला. 
एकंदरीत घटना खोटी असून ती कट रचून बनाव केल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात बी. एन. एस. कलम २४८, २१७, ६१(२) अन्वये गुन्हा नोंद करुन उभयतांना गुन्ह्यात अटक करण्यात आलीय.

ही कामगिरी पोलीस आयुक्तएम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त साो, (गुन्हे/विशा) श्रीमती अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (विभाग-०२) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोनि (गुन्हे) सुशांत वराळे, सपोनि शितलकुमार गायकवाड, मसपोनि सविता मोरे-पाटील, मसफौ/सविता क्षिरसागर, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सफौ/अप्पा पवार, पोहेकॉ/१३१७ अजय परदेशी, पोहेकॉ/१४०४ गणेश शिर्के, पोहेकॉ/११९२ सचिन हार, पोहेकॉ/१३३५ फुटाणे, पोहेकॉ/८४० जाधव, पोकॉ/१७४५ सद्दाम अबादीराजे, पोकॉ/८५९ अमृत सुरवसे, पोकॉ/१४८९ कोर्सेगांव, पोकॉ/६५७ समाधान मारकड, पोकॉ/१७३२ राहूल विटकर, पोकॉ/१५०५ स्वप्नील जाधव, पोकॉ/९१८ संतोष माने, पोकॉ/१८४० राठोड, पोकॉ/१६०३ साळुंखे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ कार्यालयातील पोहेकॉ/१२६८ बागलकोटे, पोकॉ/६९६ गायकवाड यांनी पार पाडली.
To Top