सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रकार, समाज माध्यम तसेच स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
2025 या कॅलेंडर वर्षातील (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025) कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत असून, यापूर्वी निश्चित केलेली अंतिम तारीख 15 मार्च होती. आता ही मुदत वाढवून 31 मार्च पर्यंत करण्यात आली आहे.
सदर पुरस्कारांसाठीचे माहितीपत्रक व अर्जाचे नमुने शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in (maharashtra.gov.in in Bing), महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in (dgipr.maharashtra.gov.in in Bing) तसेच https://mahasamvad.in या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रसार माध्यम प्रतिनिधी यांनी शासनाच्या या पुरस्कारा योजनेत सहभागी व्हावे व आपल्या प्रवेशिका 31 मार्चपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूरच्या वतीने करण्यात येत आहे.