इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष प्रवर्गातील उच्च शिक्षण प्रवेशास मुदतवाढ

shivrajya patra

सोलापूर : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी, मुलामुलीचे वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे .

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी, मुलां/मुलीचे शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेकरीता शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये बी.ए./बी.कॉम./ बी.एस्सी. अशा 12 वी नंतरच्या बिगर व्यवसायिक/व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना  सोलापूर जिल्ह्यात मुला/मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवूनही अद्याप सोलापूर जिल्ह्यातील रिक्त जागा दिसून येत आहेत, सोलापूर जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय, व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.  

वसतिगृह आधार व स्वयंम योजनेकरीता https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याची प्रक्रिया दि. 25 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026  या कालावधीत सुरू राहणार आहे. तरी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गरजू व पात्र विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, गणेश सोनटक्के  यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  इतर मागास बहुजन कल्याण, कार्यालय  4 था मजाला, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा.

वेळापत्रक पुढील प्रमाणे -

बी.ए./बी.कॉम/बी.एससी. अशा 12 नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यवसायिक व अव्यसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करावयाचा कालावधी- दि.25 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 –निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिध्द करणे दि. 11 मार्च 2026 – निवड यादीनुसार अंतिम मुदत दि.12 फेब्रुवारी 2026 ते  दि. 20 मार्च 2026                                                

                                                                          00000

To Top