युवा समुपदेशनाची आज आहे नितांत गरज : लायन डॉ. विरेंद्र दिखले

shivrajya patra

अय्युब नल्लामंदू आणि मनीष सुरवसे यांना " साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित

सोलापूर : आजच्या युगात युवकांचे मानसिक आरोग्य अथवा मानसिक समस्या हे अत्यंत गंभीर बाब बनलेली आहे. यावर युवा विकास व समुपदेशन केंद्राची स्थापना हे लायन्स इंटरनॅशनल ने हाती घेतलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे" आज अशा उपक्रमाची नितांत गरज आहे, अस प्रतिपादन लायन्स क्लबचे प्रांतपाल एमजेएफ लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले यांनी केले. 

लायन्स क्लब सोलापूर मेट्रो व ब्रेन शैक्षणिक समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित विश्व युवा विकास व समुपदेशन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित प्रांतपालाचे अधिकृत भेट व समाज रत्नाच्या पुरस्कार प्रदान समारंभात विभागीय अधिकारी लायन श्रीनिवास कटकुर, क्षेत्रीय अधिकारी लायन सोमशेखर भोगडे, प्रथम उपाध्यक्ष लायन राजेंद्र कासवा, क्लबचे अध्यक्ष लायन विश्वनाथ आवटे, सचिव लायन सुरेश चिकणे, प्रांत खजिनदार लायन सांगोडकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी स्थापित युवा विकास व  समुपदेशन केंद्राच्या कार्यप्रणाली विषयक दृकश्राव्य सादरीकरण ब्रेन कन्सल्टन्सीच्या मुख्य अधिकारी सौ अर्पिता कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमात सोलापुरातील राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता प्रज्वल श्याम जोशी, टाटा कन्सल्टंटसीमधील सिस्टम इंजिनियर सौरभ मोहोळे, शैक्षणिक तक्ता स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते संकेत लिगाडे,  रितेश लुगडे, विविध प्रशालेतील समन्वयक शिक्षिका सौ. उल्हासबाई बनसोडे, सौ. माधुरी कुलकर्णी, सौ. लक्ष्मी कंदीकटला, सौ. इंदिरा चिप्पा, सबरीन सौदागर, शिरीन खान, शोभा दुलंगे यांचा सत्कार करण्यात आला. 

सामाजिक बांधिलकी व जागरण  साहित्याद्वारे प्रकट करणारे युवा साहित्यिक मनीष सुरवसे, उर्दू मराठी साहित्यिक अय्यूब अहमद नलामंदू यांचा प्रांतपालांच्या हस्ते साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लायन महबूब शेख, लायन विश्वनाथ आमणे, रजिया शेख, लायन ईश्वर झुंजा, लायन सुरेश कुलकर्णी, लायन सुजाता आमणे, लायन अर्चना सलवारू, लायन निर्मला भांजे,  लायन शलाका कुलकर्णी, किरण कुलकर्णी, सोमनाथ पवार, प्रतीक्षा दुर्लेकर, अंबिका पलेलू यांनी विशेष परिश्रम घेतले. 


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन अशोक भांजे यांनी केले तर सचिव विश्वनाथ आमणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार केले.

या वेळी शमा शिक्षण प्रसारक मंडळाचे अबूबकर नल्लामंदू , ग्रंथपाल संघटनेचे जाफर बांगी, इंदिवन युथ असोसिएशनचे मजहर अल्लोळी उपस्थित होते.

To Top