सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच घडलेल्या हत्येने नागरिकांचं लक्ष वेधलेल्या लष्कर परिसरात तृतियपंथी अयुब हुसेन सय्यद याच्या खून प्रकरणी गुन्हा गुन्हे शाखा व सदर बझार पो.स्टे. कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 06 तासाच्या आत यशराज उत्तम कांबळे (लातूर) याच्यासह तिघा आरोपींना गजाआड केलं. त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता, न्यायालयानं त्यांना 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
उत्तर सदर बझार लष्कर येथे 26 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वा. ते 27 डिसेंबर रोजी दुपारी 01:30 वा. च्या दरम्यान अयुब हुसेन सय्यद (तृतीयपंथी) यांचा राहत्या घरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाने खून केला होता. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली.
त्यानुसार पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), पोलीस उप-आयुक्त गुन्हे/वि.शा. व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच सदर बझार पो.स्टे. कडील अधिकारी व अंमलदार यांना हा गंभीर स्वरूपाचा खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांनी गुन्हे शाखेकडील व सदर बझार पो. स्टेशनकडील वपोनि नामदेव बंडगर यांनी पोलीस ठाण्याकडील तपास पथकांना वरील प्रमाणे घडलेला गंभीर खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य मार्गदर्शन/सूचना देऊन त्यांना तपासाकरीता रवाना केले होते.
त्यानुसार गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. विजय पाटील, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. दत्तात्रय काळे, पो. उपनि. मुकेश गायकवाड, ग्रेड पो. उपनि. शामकांत जाधव व त्यांचे पोलीस पथक तसेच सदर बझार पो.स्टे. कडील सपोनि सागर काटे व त्यांचे पोलीस पथक यांनी तांत्रिक माहितीचे आधारे व सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करून नमूद गुन्हा हा 03 इसमांनी मिळून केल्याची व हे आरोपी हे लातूरच्या दिशेने गेल्याचे खात्रीशीर दिसून आले.
त्यानुसार शनिवारी, 27 डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे व सदर बझार पो. स्टे कडील तपास पथके तात्काळ लातूरकडे रवाना होऊन या गुन्ह्यात 03 आरोपींची ओळख पटविली. त्यानंतर लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलीसांची मदत घेऊन त्या त्रिकुटास विवेकानंद चौक येथील पाण्याचे टाकीजवळील परिसरातील येथून ताब्यात घेतले. पो. नि. भालचंद्र ढवळे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-02) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने, स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. विजय पाटील, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. दत्तात्रय काळे, पो. उपनि. मुकेश गायकवाड, ग्रेड पो. उपनि. शामकांत जाधव व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, बापू साठे, अंकुश भोसले, संदिप जावळे, जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद रजपूत, महेश शिंदे, वाजीद पटेल, योगेश बर्डे, शैलेश बुगड, काशिनाथ वाघे, राजकुमार वाघमारे, आबाजी सावळे, संजय साळुंखे, कुमार शेळके, अभिजित धायगुडे, राजकुमार पवार, इम्रान जमादार, धिरज सातपुते, अजिंक्य माने, सैपन सय्यद, सुभाष मुंडे, वसिम शेख, राजु मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड तसेच सदर बझार पो.स्टे. कडील व.पो.नि. नामदेव बंडगर, पोनि ढवळे, स.पो.नि. सागर काटे व पोलीस पथकाने पार पाडली.
... हे आहेत निष्पन्न आरोपी !
यशराज उत्तम कांबळे (वय-२१ वर्षे, व्यवसाय शिक्षण रा. बौध्द विहार जवळ, इंदिरा नगर लातूर), आफताब इसाक शेख (वय-२४ वर्षे, व्यवसाय मजुरी) आणि वैभव गुरूनाथ पनगुले (व्यवसाय शिक्षण, दोघे रा. कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर)
... असा आहे गुन्ह्याचा घटनाक्रम !
या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी आफताब इसाक शेख व अयुब हुसेन सय्यद हे यापूर्वीपासूनच ओळखीचे असून आफताब शेख हा सय्यद यास भेटण्याकरीता वारंवार सोलापूर येथे येत होता. त्यावेळी आफताब शेख याला अयुब याच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याची त्यास माहिती होती, असं त्यांच्याकडे करण्यात आलेल्या अधिक चौकशीमध्ये पुढं आलंय.
त्याप्रमाणे सर्व आरोपी अयुब सय्यद यास भेटण्याचा बहाणा करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने चोरण्याचे उद्देशाने यशराज कांबळे याच्याकडील युनिकॉर्न मोटार सायकलवरून सोलापूर आले होते.
त्यावेळी त्या तिन्ही आरोपींनी मिळून अयुब सय्यद याचा त्याचे राहते घरी खून करून आयुब याच्या घरातील सोन्यासारखे दिसणारे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच खून करून जातेवेळी त्या तिघांनी मृताची यामाहा स्कूटी मोटार सायकल चोरून घेऊन गेले होते.
