महाराष्ट्र संघात जिल्ह्याचे पाच खेळाडू ; मोहन राजपूत प्रशिक्षक

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र संघात सोलापूर जिल्हा संघातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे.  कुमार संघाच्या प्रशिक्षकपदी येथील किरण स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक मोहन रजपूत यांची निवड झाली आहे. त्यांचे सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सरचिटणीस उमाकांत गायकवाड यांनी अभिनंदन केले.

निवडलेले खेळाडू : 

शंभूराजे चंदनशिव, 

अरमान शेख,

सिद्धार्थ माने-देशमुख (सर्व अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ, वेळापूर), 

प्राजक्ता बनसोडे (अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ, वेळापूर),

स्नेहा लामकाणे (कल्याणराव काळे स्पोर्टस क्लब वाडीकुरोली, ता. पंढरपूर).

To Top