कार्ड मंजुरीसाठी हात पुढे; अन्न वितरण अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडला एसीबी च्या जाळ्यात

shivrajya patra

पुणे/पिंपरी : अन्नधान्य वितरण विभागाच्या 'फ' झोनचे भोसरी येथील परिमंडळ अधिकारी गजानन अशोकराव देशमुख (वय-36 वर्षे, रा. धनकवडी, पुणे) याला 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. भोसरी येथे अन्न वितरण कार्यालयात गुरुवारी, 11 डिसेंबर दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. 14 नागरिकांच्या नवीन रेशनकार्ड मंजुरीसाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्य करत असलेल्या 25 वर्षीय तरुणाने यासंबंधी बुधवारी, 10 डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारदार दिव्यांग असून समाजकार्यात सक्रिय आहे. त्यांच्या ओळखीतील 14 जणांची नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण करून 'एन' नंबर प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार हे अन्न नागरी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक गजानन देशमुख याला भेटले. तेव्हा त्याने प्रत्येक रेशनकार्डसाठी 900 रुपयांप्रमाणे 12,600 रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम शासकीय फी व्यतिरिक्त असल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली.

एसीबी च्या पडताळणीदरम्यान देशमुख याने 14 रेशनकार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुरुवातीला 19 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर 16 हजार रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार गुरुवारी दुपारी भोसरी येथील अन्नधान्य वितरण कार्यालयात सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून 16 हजार रुपये लाच स्वीकारताना गजानन देशमुख याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम o7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, आसावरी शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 ... चौकट ...

सोलापुरातही कोणत्याही क्षणी होऊ शकते या घटनेची पुनरावृत्ती

सोलापुरातही एक परीमंडळ अधिकारी एका विशिष्ट महा ई सेवा मधून कार्ड त्वरित मिळण्याची सोय केली आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी वेळीच पायबंद केले नाही, तर सोलापुरातही या घटनेची पुनरावृत्ती कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे नागरिकांमधून बोललं जात आहे.

To Top