सरत्या वर्षात 83 तडीपार; एकूण 4631 जणांवर विविध कलमांतर्गत प्रतिबंधक कारवाई

shivrajya patra

सोलापूर : पोलीस आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक शांतता व नागरिकांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी 2025 या वर्षभरात 4,631 आरोपींवर विविध कलमांतर्गत प्रतिबंधक कारवाई केल्याचं एका प्रसिध्दी पत्रकान्वये सांगण्यात आलंय.

त्यात समाजास घातक असलेल्या एकुण 83 आरोपींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55, 56 व 57 अन्वये तडीपार केलेले आहे.

शरिराविषयी गुन्हे करणारे एकूण 3,631 आरोपींकडून सार्वजनिक शांतता राखण्याकरीता भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 126 प्रमाणे कारवाई करुन त्यांचेकडून एक वर्ष मुदतीचे अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.

गर्दीच्या ठिकाणी संशयीतरित्या फिरत असताना चांगल्या वर्तणुकीसाठी एकूण 257 आरोपीकडून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 128 प्रमाणे कारवाई करुन त्यांचेकडून एक वर्ष मुदतीचे अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.

मालाविषयी गुन्हे करणारे एकूण 413 आरोपीकडून चांगल्या वर्तणुकीसाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 129 प्रमाणे कारवाई करुन त्यांचेकडून एक वर्ष मुदतीचे अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.

हातभट्टी दारु विक्री करणारे एकूण 241 सराईत आरोपीकडून चांगल्या वर्तणुकीसाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 93 प्रमाणे कारवाई करुन त्यांचेकडून एक वर्ष मुदतीचे अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 93 मधील एकुण 05 आरोपीतांनी बंधपत्राचे उल्लंघन केल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 141 प्रमाणे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 129 मधील 01 आरोपीने बंधपत्राचे उल्लंघन केल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 141 प्रमाणे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. (असे एकुण 06 आरोपींची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केलेली आहे.)

To Top